Friday, October 23, 2026
Homeचंद्रपूरपाच वर्षीय मुलीवर १६ वर्षीय मुलाचा अत्याचार... - आरोपी मुलाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा...

पाच वर्षीय मुलीवर १६ वर्षीय मुलाचा अत्याचार… – आरोपी मुलाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका पाच वर्षीय मुलीवर दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची घटना काल,सोमवारी ११ नोव्हेंबरला उघडकीस आली. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
पीडित मुलीचे वडील ट्रक चालक आहेत.रविवारी १० नोव्हेंबरला त्यांची पत्नी टीईटी परीक्षा देण्यासाठी चंद्रपूरला गेली होती.परीक्षेनंतर पत्नीला बल्लारपूरला आणायचे असल्याने वडिलांनी मुलीला शेजारच्या कुटुंबात ठेवले होते.सायंकाळी आई-वडील घरी
असता त्यांच्या पत्नीने मुलीला नाश्ता करायला आवाज दिले.मुलीला अस्वस्थ बघून आईने विचारले असता तिने १६ वर्षीय मुलाने केलेल्या कृत्याची माहिती दिली.एका खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी नेले असता लैंगिक शोषण झाल्याचे पुढे आले.रविवारी मुलीच्या आई-वडिलांनी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिले असून पोलिसांनी १६ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. – थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; १३५ कोटींच्या सिंचन निधीचीही घोषणा..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम ​सिंदेवाही(चंद्रपूर):-धानाचे पीक अंतिम टप्प्यात असतांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले होते.शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात...

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य...

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!