Friday, October 2, 2026
Homeसिंदेवाहीपहिल्यांदा वाघिणीचा हल्ला; हल्ल्यात वनरक्षक गंभीर जखमी.. - अन् काही वेळातच 'टी-८४'...

पहिल्यांदा वाघिणीचा हल्ला; हल्ल्यात वनरक्षक गंभीर जखमी.. – अन् काही वेळातच ‘टी-८४’ वाघिणीचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर शेतशिवार परिसरात आज,रविवार २६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली.विशेष म्हणजे,शेतशिवारात भटकंती करणाऱ्या वाघिणीने पहिल्यांदा वनरक्षकावर हल्ला चढवला आणि काही तासातच वाघिणीचा मृत्यू झाल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. सदरचा प्रकार ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपक्षेत्रातील रत्नापूर शेत शिवारात घडला.यात ‘टी-८४'(T-84)या वाघीणीचा संशयास्पद मृत्यू झाला.या घटनेत एका वनरक्षकाला गंभीर दुखापत झाली आहे.
सिंदेवाही तालुक्याच्या रत्नापूर परिसरातील मक्याच्या शेतात आज दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास एक वाघीण फिरत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.सदरची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.माहिती मिळताच परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली.गर्दी वाढल्याने वाघीण अस्वस्थ झाली आणि तिने उपस्थितांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पुढे सरसावलेले वनरक्षक पारेकर यांच्यावर वाघीणीने हल्ला केला.या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर वाघीण जवळच्याच शेतात जाऊन बसली. मात्र,सुमारे अर्ध्या तासानंतर म्हणजेच दुपारी १ वाजताच्या सुमारास वाघीण मृत अवस्थेत आढळून आली.वाघीणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला,याबाबत संभ्रम निर्माण झाला असून त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.उपवनसंरक्षक (ब्रम्हपुरी),सहाय्यक वनसंरक्षक(तेंदू),सहाय्यक वनसंरक्षक(प्रादेशिक व वन्यजीव),तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी,स्थानिक वन्यजीव तज्ज्ञ आणि इतर अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.मृत वाघीणीचे वय अंदाजे ९ ते १० वर्षे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.पुढील तपासणीसाठी तिचे शव सिंदेवाही येथील मध्यवर्ती काष्ठ भांडारात नेण्यात आले.तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने शवविच्छेदन केले.तसेच अधिक तपासासाठी आवश्यक नमुने(विसेरा)जतन करण्यात आले आहेत. शवविच्छेदनानंतर सर्व अधिकाऱ्यांच्या आणि पंचांच्या उपस्थितीत वाघीणीचे दहन करण्यात आले.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.वाघीणीच्या मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतरच स्पष्ट होणार असून वनविभाग या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

श्रमदान,सत्कार अन् संदेशपर नाटक; नैनपूरच्या शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवारी महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर येथे पालक सभा,श्रमदान,सत्कार व विविध...

कारवाईच्या भीतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई पसार.. -प्रकरण मिटविण्यासाठी दहा हजाराची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गुन्ह्यात तडजोड करून प्रकरण मिटवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपाई यांच्याविरुद्ध...

गडचिरोली जिल्ह्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी निर्बंध; डीजे व अतितीव्र ध्वनी उपकरणांच्या वापरास बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सण,उत्सव,मिरवणुका तसेच धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी उपकरणांच्या वापरावर निर्बंध...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम लागू करा; अन्यथा देशव्यापी तीव्र आंदोलन व जनगणनेवर बहिष्कार.. -सकल ओबीसी संघटनेचा इशारा; आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी होऊ घातलेल्या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल तर जनगणनेत ओबीसी समाज सहभाग नोंदवणार नाही. ड्रॉप-डाऊन मेन्यु व स्वतंत्र काॅलम लागु करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!