- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घालून, संतापाच्या भरात चाकूने वार करून,पत्नीची हत्या करणाऱ्या धनपाल रामटेकेला न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.चंद्रपूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश कदम यांनी हा निर्णय दिला.धनपाल माधव रामटेके वय ६० वर्षे, रा.कुडेसावली,ता.गोंडपिपरी,जि.चंद्रपूर असे शिक्षा सुनावलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
धनपाल रामटेके हा त्याची पत्नी वंदना रामटेके वय ६० वर्षे यांच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे.घटनेच्या दिवशी म्हणजेच १२ सप्टेंबर २०२४ रोजी धनपालने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत सकाळच्या सुमारास वाद घातला.यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.भांडण सुरू असतांनाच धनपालने घरातील चाकू आणून पत्नीवर सपासप वार केले.यात वंदना रामटेके जागीच कोसळल्या आणि मृत पावल्या.सदरची घटना मुलाच्या लक्षात येताच त्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. मुलगा अमर रामटेके याने दिलेल्या तक्रारीवरून कोठारी पोलिसांनी धनपाल रामटेके विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर,कोठारी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले.हत्येसाठी वापरलेला चाकू,वैद्यकीय अहवाल,प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष व इतर सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबी तपासल्या गेल्या.तसेच सरकारी वकील आसिफ शेख यांनी न्यायालयात कणखर बाजू मांडल्याने सर्व बाबींचा विचार करता न्यायालयाने धनपाल रामटेकेला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
- Advertisement -

