Saturday, June 20, 2026
Homeनागपूरनिवडणुकीची रणधुमाळी संपताच काँग्रेस मध्ये उडाली खळबळ…-दोघांचे निलंबन; ४९ नेत्यांना कारणे दाखवा नोटीस..बड्या नेत्यांचा समावेश…

निवडणुकीची रणधुमाळी संपताच काँग्रेस मध्ये उडाली खळबळ…-दोघांचे निलंबन; ४९ नेत्यांना कारणे दाखवा नोटीस..बड्या नेत्यांचा समावेश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- विदर्भातील १० जागांसाठी मतदान संपले असून निवडणुकीची रणधुमाळी संपताच काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे.निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न केल्याने आणि काम न केल्याने अखिल भारतीय युवक काँग्रेसने प्रदेश युवक काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार आणि युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांच्यासह ४९ अधिकाऱ्यांना कारणे नोटीस बजावण्यात आली आहे.विशेष म्हणजे ज्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत ते सर्व विदर्भातील आहेत.

निवडणुकीत काँग्रेस उमेदवारासाठी काम न केल्याने नागपूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथिलेश कन्हेरे यांना पक्षाने पक्षातून हाकलून दिले आहे. कान्हेरे रामटेक येथील लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्याम बर्वे यांचा साठी काम न केल्याने आणि प्रचारात सहभागी नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.यासोबतच गडचिरोली युवक काँग्रेसचे अध्यक्ष लॉरेन्स गेडाम यांनाही पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे.

पक्षाच्या नियोजित कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने शिवानी वडेट्टीवार,अभिषेक धवड,माजी नगरसेविका व युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस नेहा निकोसे, कीर्ती आकेरे, उपाध्यक्ष तन्वीर मुताभि, सचिव आकाश हेटे, आकाश घाटोळे यांच्यासह ४९ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून उत्तरे मागितली आहे.

शिवानी वडेट्टीवार या स्वतः चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होत्या. पण, काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना तिथे उमेदवारी दिली. त्यामुळे शिवानी वडेट्टीवार नाराज होत्या.त्यांनी पक्षाची कामे केली नसल्याची तक्रार आहे.त्यांनी समाधानकारक खुलासा न केल्यास त्यांना युवक काँग्रेसमधून बडतर्फ केले जाऊ शकते; असे सांगण्यात येत आहे.

(साभार – महाराष्ट्र टाइम्स )

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!