Sunday, August 30, 2026
Homeनागपूरआधी प्रेमविवाह; नंतर चारित्र्यावर संशय अन् शेवटी जन्मठेपेची शिक्षा….

आधी प्रेमविवाह; नंतर चारित्र्यावर संशय अन् शेवटी जन्मठेपेची शिक्षा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- पत्नीच्या चारित्र्यावर असलेल्या संशयामुळे एक दिवसाच्या बाळाला फरशीवर आपटून त्याची हत्या करणाऱ्या नराधम बापाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.तसेच,दहा हजार रुपये दंड ठोठावला.न्यायाधीश गणेश देशमुख यांनी हा निर्णय दिला.सदर घटना मेडिकलमध्ये घडली होती.

गिरीश ऊर्फ श्रीकांत गोंडाणे वय ३२ वर्षे,असे आरोपीचे नाव असून तो सावर्डी,नांदगाव पेठ, अमरावती येथील रहिवासी आहे.त्याचा, पत्नी प्रतीक्षासोबत २०२१ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर तो तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. दरम्यान,प्रतीक्षाला गर्भधारणा झाली.बाळंतपणाच्या वेळी तब्येत खालावल्यामुळे तिला नागपुरातील मेडिकलमध्ये हलविण्यात आले.तिने ३१ डिसेंबर २०२२ रोजी मुलाला जन्म दिला.आरोपी त्या दिवशी सायंकाळी ७ च्या सुमारास मेडिकलमध्ये गेला. त्याने प्रतीक्षासोबत भांडण केले व रागाच्या भरात तिच्या कुशीत झोपलेल्या मुलाला उचलून हवेत फिरवले आणि फरशीवर आपटले.त्यामुळे ते मुल जागेवरच मरण पावले.सुरक्षा गार्ड उत्तरा द्विवेदी यांनी इतरांच्या मदतीने आरोपीला पकडून अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले.सहायक पोलिस निरीक्षक आनंदकुमार खंडारे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध खटला दाखल केला.न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड.क्रांती शेख (नेवारे) यांनी कामकाज पाहिले.त्यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब व पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!