- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच हाती आले आहेत.निकालादरम्यान जयपराजयामुळे कुठे उत्साह तर कुठे नाराजीचे वातावरण आहे. अशातच राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे लाखनी येथील एका नगरसेवकाने भाजपा जिल्हाध्यक्षांशी मोबाइलवर संवाद साधतांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा नवनिर्वाचित आमदार नाना पटोले यांच्याबद्दल शिवराळ भाषेचा प्रयोग केल्याने राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे.काँग्रेसचे लाखनी तालुकाध्यक्ष योगराज झलके यांनी याबाबत कार्यकर्त्यांसह लाखनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.यावर पोलिसांकडून काय कारवाई केली जाते,याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
सदर नगरसेवकाने भाजपा जिल्हाध्यक्ष यांना शनिवारी २३ नोव्हेंबरच्या रोजी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास,मोबाइलवर संपर्क साधला होता.यावेळी जिल्हाध्यक्षांनी निवडून आल्याबद्दल आ.नाना पटोले यांचे अभिनंदन करायला हवे,असे विचार मांडले. दरम्यान,बातचीत करतांना नाना पटोले यांच्याबद्दल नगरसेवकाने अपमानजनक अश्लील भाषेचा वापर केला.या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने जिल्ह्यासह लाखनी तालुक्यात काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.या घटनेची दखल घेत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगराज झलके यांच्या मार्गदर्शनात शंभरहून अधिक नाराज कार्यकर्त्यांनी काल सोमवारी लाखनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
या प्रकारामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहे.सर्वत्र मोबाइलची कॉल रेकॉर्डिंग वायरल झाली आहे.एकंदरीत,आमदार नाना पटोले पटोले यांची प्रतिमा मलीन करण्याचा तर हा डाव नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या घटनेचा काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे.संवादाची रेकॉर्डिंग एका पेन ड्राइव्ह मध्ये घेऊन पोलिसांना सोपविण्यात आली असून लाखनी पोलिसांकडून काय कारवाई केली जाते.याकडे तालुक्यासह जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.
- Advertisement -