उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- जिल्ह्यामध्ये गुंतवणुकदारांच्या रकमेची अफरातफर करून फसवणुक केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या.या पार्श्वभूमीवर निधी गुंतवणुक करणाऱ्या कंपन्यांमध्ये नागरिकांनी गुंतवणुक करू नये; असे आवाहन आर्थीक गुन्हे शाखेने केले आहे. जिल्ह्यातील तीन बचत कंपन्या अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे.काही निधी कंपन्यांनी किंवा परस्पर लाभ संस्थांनी कंपनी कायदा २०१३ कलम ४०६ नुसार व त्याखालील नियमानुसार एनडीएच – ४ अर्ज कार्पोरेट व्यवहार मंत्रालयास दाखल केले नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील येहोवा यीरे बचत निधी लि. चंद्रपूर,संपदा अर्बन निधी लि.मूल व लोढीया गोल्ड निधी लि.ब्रह्मपुरी या तीन निधी कंपन्यां अनधिकृत आहेत.त्यामुळे कंपन्यांना कामकाज सुरू ठेवण्या पासून तसेच सदस्यांकडून निधी स्वीकारण्यापासून किंवा सर्वसाधारण जनतेला या कंपन्याचे सदस्य होण्यापासून प्रतिबंधित केले आहे.याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी कळविले आहे.