Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीशहरी भागात माणसे तर ग्रामीण भागात जनावरे राहतात की काय?- घरकुल योजनेच्या...

शहरी भागात माणसे तर ग्रामीण भागात जनावरे राहतात की काय?- घरकुल योजनेच्या अनुदानात भेदभाव कां? नागरिकांचा रोष..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

सत्यवान रामटेके (संपादक)

गडचिरोली :- घरकूल योजनेसाठी शासनातर्फे शहरी भागासाठी २ लाख ५० हजार रुपये अनुदान दिले जाते.तर ग्रामीण भागासाठी १ लाख ३० हजार रुपये अनुदान दिले जात आहे.ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांची तुटपुंज्या अनुदाना अभावी थोडी-थोडी बांधकामे करून कितीतरी वर्षे बांधकामे पूर्ण करावी लागत असल्याने ग्रामीण व शहरी असा भेदभाव कां? शहरी भागात माणसे तर ग्रामीण भागात जनावरे राहतात की काय?असा सवाल ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थी नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.

सध्याच्या घडीला बांधकाम साहित्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.जसे,रेती,सिमेंट,लोहा,गीट्टी,विटा व इतर साहित्यांचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.अशातच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना अल्पशा अनुदानात घरकूल बांधणे अवघड जात आहे.त्यामुळे काहीजण पैस्याअभावी सुरुवाती पासून अंथरूण पांघरूण पाय पसरवीत असल्याचे दिसून येत आहेत.’थेंबे थेंबे तळे साचे’ असे करतांना अनेक लाभार्थी दिसून येतात.मात्र अशाही स्थितीत लोकप्रतिनिधी चुप्पी साधून पोकळ बाता करण्याचे काम सुरू असल्याचे जनतेतून म्हटले जात आहे.

घरकुलाचे साहित्य घेतांना शहरी व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना दर सारखेच लागत असतात.उलट ग्रामीण भागातील जनतेला शहरातून घरकुलाचे साहित्य आणावे लागत असल्यामुळे अधिकचे पैसे मोजावे लागत असतात.मात्र शासनाला याची जाण आहे की नाही? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.१ लाख ३० हजारामध्ये स्वतःसाठी शासनानेच घर बांधून दाखवावे असे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांनी म्हटले आहे.शासकीय बांधकामात ज्याठिकाणी २ लाखाचे काम असते; त्याठिकाणी ५ लाखाचे काम केले जाते.तर मग ग्रामीण व शहरी असा भेदभाव कां? त्यासाठी सरसकट ग्रामीण व शहरी भागासाठी २ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे; अशी मागणी सर्वच स्तरातील घरकुल लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!