Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीनागरिकांना मिळणार ई- शिधापत्रिका - शिधापत्रिका गहाळ झाली,फाटली तरी चिंतेचे कारण नाही 

नागरिकांना मिळणार ई- शिधापत्रिका – शिधापत्रिका गहाळ झाली,फाटली तरी चिंतेचे कारण नाही 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- नागरिकांना आता घरबसल्या ऑनलाइनद्वारे ई- शिधापत्रिका काढता येणार आहे.राज्यशासनाने या निर्णयाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.कुणालाही नाममात्र शुल्कात ई- शिधापत्रिका मिळणार आहे. त्यामुळे आता शिधापत्रिका गहाळ झाली,फाटली तरी काळजी करावी लागणार नाही.

प्रत्येक कुटुंबाची ओळख असणारी शिधापत्रिका (रेशनकार्ड) हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्याचा उपयोग धान्य मिळविण्यासाठी होत असतो.परंतु, ही शिधापत्रिका जीर्ण झाली की फाटते,गहाळ होते किंवा अनेकदा ती सोबत बाळगावी लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते.यासाठी राज्य शासनाने ई- शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे.

संगणक चालक माहितीची पडताळणी करेल.निरीक्षक माहितीची सत्यता तपासणार आणि पुरवठा अधिकारी सर्व कागदपत्रे पाहून ई-शिधापत्रिका नागरिकांना देणार आहे.त्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड,कुटुंबप्रमुखाच्या बँकेच्या पासबुकची प्रत आणि छायाचित्र लागणार आहे.

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये (पीसीएमएस) ई-शिधापत्रिका मिळू शकणार आहे.नागरिकांनी अर्ज केल्यास १५ दिवसांत तपासणी करून ई-शिधापत्रिका देण्यात येईल.नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तीन टप्प्यांत त्याची तपासणी होईल.

अंत्योदय योजना २ रुपये, प्राधान्य कुटुंब योजना ५० रुपये,एपीएल शेतकरी ५० रुपये एपीएल शुभ्रसाठी १०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!