Wednesday, June 24, 2026
Homeभंडाराधान्य खरेदी केंद्रातील घोटाळा उघडकीस येऊनही कारवाई न करणे जिल्हा पणन अधिकाऱ्यास...

धान्य खरेदी केंद्रातील घोटाळा उघडकीस येऊनही कारवाई न करणे जिल्हा पणन अधिकाऱ्यास भोवले- अखेर जिल्हा पणन अधिकारी निलंबित

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रातील धान्य घोटाळा उघडकीस येऊनही ८ संस्थांविरूद्ध कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केल्याप्रकरणी राज्य सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांना निलंबित केले आहे.

धान्य घोटाळ्यातील गैरव्यवहारात दोषी अधिकाऱ्यांवर निलंबन सत्र सुरू असून आतापर्यंत या प्रकरणात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील चार अधिकारी निलंबित झाले आहेत.मागील महिन्यात तत्कालीन भंडारा जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील व गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन पणन अधिकारी मनोज वाजपेयी यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान गणेश खर्चे यांना भंडारा जिल्हा पणन अधिकारी म्हणून दुसऱ्यांदा पदभार देण्यात आला होता.जिल्हा पणन अधिकारी खर्चे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील ८ संस्थांनी धान खरेदी करण्यात अनियमितता केली.

त्यामुळे पणन महासंघाला २८.३९ कोटी रुपयांचा फटका बसल्याचे चौकशीतून समोर आले.परंतु,गणेश खर्चे यांनी त्या संस्थांविरूद्ध कारवाई केली नाही. केंद्रानी धान खरेदी केल्यानंतर भरडाईसाठी देताना तुट आल्याचे दिसून आले.याबाबत करण्यात आलेल्या चौकशीअंती अहवालात जिल्हा पणन अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला.या सर्व प्रकरणांत कर्तव्यात कसूर, दुर्लक्षितपणा केल्याचे दिसून आले.याप्रकरणी खर्चे यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर तसे आदेश व्यवस्थापकीय संचालक डॉ.सुग्रीव धपाटे यांनी दिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!