उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील चातगांव ग्रामपंचायतीला नवी दिल्ली येथील फॅक्ट फॉन्डींग समितीने नुकतीच भेट घेऊन गावातील व ग्रापंचायतीतील उद्भवणाऱ्या विविध समस्या जाणून घेऊन भारत सरकारला अहवाल सादर करून समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
फॅक्ट फॉन्डींग समितीने ग्रापंचायतीतील पदाधिकारी व गावातील नागरिकांशी संवाद साधून वनहक्काचे वयक्तिक व सामुहिक दावे मिळविण्यासाठी ग्रामस्थांना यानाऱ्या अडचणी,प्रशासन व ग्रामसभेची वनहक्क समीतीची भुमिका,वनहक्क दावे नामंजुर कां करण्यात आली व इतर समस्यांचा अभ्यास करून भारत सरकारला याबाबत अहवाल सादर करण्यात येणार आहे.
फॅक्ट फॉन्डींग समीतीचे सदस्य प्रतापसींग पवार सेवानिवृत्त पी.सी.सी.एफ छत्तीसगड,चैतराम पवारधुळे,युवराज लांडे,प्रकाश गेडाम,गोपाल उईके सरपंच चातगांव,रमेश आत्राम,प्रज्योत हेपट,प्रा.संतोष सुरपाम,भगिरत बेचनकुवर मडावी,वनविभागातील पदाधिकारी,महसूल विभाग,जिल्हा परिषद विभागातील पदाधिकारी,कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.