Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीग्रामीण भागातील गृहिणींचा स्वयंपाक पुन्हा चुलीवर- गॅस सिलिंडरच्या वाढत्या दराचे परिणाम

ग्रामीण भागातील गृहिणींचा स्वयंपाक पुन्हा चुलीवर- गॅस सिलिंडरच्या वाढत्या दराचे परिणाम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- रोजची रोजी-रोटी कमावून खाणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या दराने आर्थिक विवंचनेत टाकले आहे.अशातच मिळणारी सबसिडीही बंद झाली असल्याने गॅस खरेदी करावे की उदरनिर्वाह करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील गृहिणींचा कल पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वाढलेला दिसून येतो आहे.

केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेमुळे गोरगरीबांच्या घरात गॅस सिलिंडर शेगडी पोहोचली आणि चुलींवरील स्वयंपाकाच्या धुरामुळे होणाऱ्या आरोग्यबाधेपासून त्यांचा बचाव झाला.योजनेच्या वेळेस गॅस सिलेंडर ‘स्वस्तात मस्त’ म्हणून नागरिकांना भुरळ घातली गेली.मात्र हल्ली गॅस सिलिंडर १२०० रुपयांपर्यंत खरेदी करण्याची वेळ आल्याने गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा उज्ज्वला गॅस धारकांना चुलीवर परतावे लागले आहे.चुलीवरच्या स्वयंपाकामुळे ग्रामीण भागातील महिलांना श्वसनाचे,डोळ्याचे,फुफ्फुसाचे आजार व इतर आजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले तर वन्यप्राण्यांचा धोका आणि मोडी आणल्या तर अवैध वृक्षतोडीचा गुन्हा.यामुळे ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशा पेचप्रसंगात ग्रामीण भागातील जनता अडकली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!