Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजरेती घाटावर महसूल विभागाने मारला खड्डा; रेती तस्करांनी पुन्हा चालवला अड्डा..!- देसाईगंज...

रेती घाटावर महसूल विभागाने मारला खड्डा; रेती तस्करांनी पुन्हा चालवला अड्डा..!- देसाईगंज तालुक्यातील सावंगी रेती घाटातील प्रकार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- तालुक्यातील सावंगी वैनगंगा नदी रेती घाटावर अवैध रेती तस्करीवर काही काळ आळा घातला जावा; यासाठी वैनगंगा नदी घाटात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मधोमध भला मोठा खड्डा जेसीबीच्या सहाय्याने मारण्यात आला होता.मात्र रेती तस्करांनी मारलेला खड्डा बुजवून रेती तस्करीचा अड्डा चालविला असल्याने परत पुन्हा काल २१ मार्च २०२३ रोजी देसाईगंज महसूल विभागाने रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी खड्डा मारला आहे.

रेती चोरींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.अशातच महसूल विभागाकडून रेती तस्करीवर कितीही आळा घातला गेला तरी काही मुजोर रेती चोरटे व काही तथाकथित जणांकडून मिलीभगत केली जात असल्याने रेती तस्करी निर्ढावलेली दिसून येत आहे.अवैध रेती चोरीमध्ये पाणी पडल्यासारखा चटकन आणि पटकन पैसा जमा होत असल्याने रेती चोरीसाठी भाड्याने ट्रॅक्टरे व इतर साहित्यांचा वापर केला जात असल्याची खमंग चर्चा तालुक्यात सुरू आहे.

नवलाची बाब म्हणजे,सावंगी वैनगंगा नदी रेती घाटातील खड्डा बुजविण्यास रेती चोरट्यांनी काही अंतरावर असलेल्या महसूल विभागाच्याच गौण खनिजाचे वापर केल्याचे दिसून येते.म्हणजे ‘तुमचा खड्डा आणि आमचा अड्डा’ असे चोरट्यांकडून केल्या जात आहे.सदरची बाब सांध्य दैनिक ‘विदर्भ की दहाड़’ च्या प्रतिनिधी टीमने प्रत्यक्ष पाहनी करुन देसाईगंज महसूल विभागाच्या लक्षात आणून दिली असता लगेच काल २१ मार्च २०२३ रोजी दुपारच्या सुमारास देसाईगंज महसूल विभागाचे नायब तहसीलदार नैताम,मंडळ अधिकारी फुलकवर,तलाठी वनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जेसीबीच्या साहाय्याने मुख्य रस्त्यावर भला मोठा खड्डा खोदण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!