Tuesday, July 21, 2026
Homeब्रम्हपुरीअर्हेर-नवरगाव ते ब्रम्हपुरी रस्त्याची दुरावस्था

अर्हेर-नवरगाव ते ब्रम्हपुरी रस्त्याची दुरावस्था

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी :- तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्हेर नवरगाव ते ब्रह्मपुरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.एखादा भीषण अपघात होतो आणि प्रशासनाला जाग येते.तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम शासकीय अधिकारी ठेकेदाराच्या माध्यमातून करतात.थातूरमातूर काम केले जाते; परंतु रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

अर्हेर-नवरगाव ते ब्रह्मपुरी मार्ग परिसरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे.त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची गर्दी दिसून येते.मागील काही वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे; परंतु दरवर्षी रस्त्याची केवळ डागडुजी केली जाते.त्यामुळे दरवर्षीच रस्त्यावर खड्डे दिसून येतात.रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम तात्पुरत्या स्वरूपात मार्च एंडिंग’च्या खर्च तरतुदीनुसार फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले; परंतु काही ठिकाणी फक्त मध्यम स्वरूपाची गिट्टी टाकून थातूरमातूर काम केले आहे.दरवर्षी अशी तात्पुरती डागडुजी करण्यापेक्षा सिमेंट काँक्रिटचे पक्के बांधकाम करावे; अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!