- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील प्रसिद्ध सातबहिणींच्या डोंगरावर मुलीचा नवस फेडण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांवर अचानकपणे मधमाश्यांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.यात ३ वर्षीय चिमुकली सायली चाचरकर,पुजारी विठ्ठल चाचरकर वय ५५ वर्षे,नत्थू चाचरकर वय ६२ वर्षे व कविता चाचरकर वय ५२ वर्षे अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चाचरकर कुटुंबातील काही सदस्य सातबहिणींच्या डोंगावर आपल्या मुलीचा नवस फेडण्यासाठी गेले होते. त्यांनी पूजा सुरू केली असतांनाच अचानक मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.यामुळे पूजास्थळी एकच धावपळ उडाली.सर्वजण जीवाच्या आकांताने वाट मिळेल तिकडे पळत सुटले.मात्र,मधमाशांच्या हल्ल्यात चारजण गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलिस ठाण्याचे ठाणेदार व वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.बचावकार्य राबवून सर्वांना तातडीने गोविंदपूर व तळोधी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असून घटनेने भाविकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
- Advertisement -

