Saturday, October 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना करणे व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.यात रोहयो विभागातील म्हणजेच रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती हर्षलता गेडाम व भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती निशाताई कांबळे अशी निलंबित करण्यात आलेल्या दोन्ही उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यांची नावे असून
याबाबत महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार सदरची कारवाई केली आहे.या संदर्भातील प्रत्र नुकतेच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.तसेच ‘महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणूक) नियम,१९७९’ मधील नियम ३ चा भंग केल्याने शासनाने दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी करण्याचे देखील निश्चित केले आहे.निलंबन कालावधीत दोन्ही अधिकाऱ्यांचे मुख्यालय रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय राहणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्षुल्लकशा कारणावरून शालेय विद्यार्थ्याने घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-क्षुल्लकशा कारणावरून एका ११ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर शहरालगत असलेल्या बल्लारपूर मार्गावरील विसापूर येथील एका...

माहूरगडच्या श्री रेणुका माता शक्तिपीठातून दिव्य ज्योत आणण्यासाठी चोपचे भक्त रवाना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुका माता शक्तिपीठ,माहूरगड येथून पवित्र दिव्य ज्योत आणण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ,चोपचे भक्त आज,शनिवार १० ऑक्टोंबरला रवाना झाले.गेल्या...

आगामी काळात अन्न धान्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा महाराष्ट्र राज्यात पड़लेल्या भीषण दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतातील उभी पिके उद्धवस्त झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात...

तब्बल १२ लाखांहून अधिक हिवताप चाचण्या; हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!