Saturday, October 10, 2026
Homeकुरखेडादोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कुरखेडा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुरखेडा-वाकडी मार्गावर घडली.धर्मराज तुळशीराम बोदेले वय ३७ वर्षे,रा.गोठणगांव,ता.कुरखेडा,जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.तर दुसऱ्या दुचाकीवरील चालक कोरची येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात विपणन निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे कासकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
आज सायंकाळच्या सुमारास वाकडी मार्गावरील कुरखेडा नगरपंचायतीच्या डम्पिंग यार्ड नजिक दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसताच धडकेचा आवाज जवळपास पाचशे मीटरच्या परिसरात स्फोट झाल्यासारखा झाल्याने मार्गावरून ये-जा करणारे नागरिक तसेच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.काहींनी १०८ क्रमांकावरून रुग्णवाहिकेस,तर काहींनी कुरखेडा पोलीस प्रशासनास संपर्क साधला.लागलीच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना उपस्थितांच्या सहकार्याने ई-रिक्षामधून कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात धर्मराज बोदेले यांना मृत घोषित करण्यात आले,तर कासकर यांचेवर उपचार सुरू आहेत.घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहूरगडच्या श्री रेणुका माता शक्तिपीठातून दिव्य ज्योत आणण्यासाठी चोपचे भक्त रवाना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुका माता शक्तिपीठ,माहूरगड येथून पवित्र दिव्य ज्योत आणण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ,चोपचे भक्त आज,शनिवार १० ऑक्टोंबरला रवाना झाले.गेल्या...

आगामी काळात अन्न धान्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा महाराष्ट्र राज्यात पड़लेल्या भीषण दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतातील उभी पिके उद्धवस्त झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात...

तब्बल १२ लाखांहून अधिक हिवताप चाचण्या; हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे...

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!