Saturday, March 15, 2025
Homeगडचिरोलीदोन दिवसीय बालरोग शस्त्रक्रिया शिबीर संपन्न…
spot_img

दोन दिवसीय बालरोग शस्त्रक्रिया शिबीर संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात आर.बी.एस.के. (राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम) व डी.ई.आई.सी. (डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेंशन सेन्टर) अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील ४D’s तपासणी नुसार आढळून आलेले बालके/विध्यार्थी यांची नोंदणी,तपासणी, निदान निश्चिती,उपचार,गरजेनुसार थेरेपी व शस्त्रक्रिया विभागात संदर्भसेवा व तृतीय स्तरावर संदर्भसेवा दिली जाते.RBSK-DEIC तर्फे जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली,डॉ. प्रमोद खंडाते,वैद्यकीय अधिक्षक,जिल्हा महिला व बाल रुग्णालय,गडचिरोली डॉ.माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनात तसेच अति.जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. साळुंखे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धुर्वे, यांच्या नियोजनामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय येथील शस्त्रक्रिया विभागात संशयीत जन्मजात आजाराच्या बालकांकरिता दोन दिवसीय “बालरोग शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले.

दोन दिवसीय शिबिरामध्ये पहिल्यांदाच एकूण ४० बालरोग शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या.यामध्ये Phimosis-१७, Hernia-१७, Dermoid Cyst-०२, Hydrocele-०१, Und Testis-०१, Lipoma-०१, Other-०१ यांचा समावेश आहे. 

सदर शिबीराकरिता (Indian Association of Paediatric Surgeon) IAPS टीम उपस्थित झाले, यामध्ये लता मंगेशकर रुग्णालय,नागपूर येथील प्रसिद्ध डॉ.मनिषा अलबल (बालरोग शल्य चिकित्सक),डॉ.मांडलिक(बालरोग भूलतज्ञ) व इतर तज्ञ उपस्थित झाले.तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डॉ.साखरे(भुलतज्ञ),डॉ.कृणाल (शल्य चिकित्सक),डॉ.डहाके (शल्य चिकित्सक),डॉ. निखिल चव्हाण (बालरोग तज्ञ) उपस्थित होते.त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया विभाग येथील इन्चार्ज शिस्टर, अधीपरिचारिका,OT कर्मचारी व शस्त्रक्रियापूर्व व पश्चात रुग्ण वार्ड नं.२ व ५ येथील अधीपरिचारिका यांच्या मदतीने तसेच शिबीर आरबीएसके व डीईआईसी विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वी झाले.असे जिल्हा शल्य चिकित्सक,सामान्य रुग्णालय,गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!