Tuesday, September 22, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहरातील कोट्यावधी रुपयांचे सांस्कृतिक भवन बनला शोभेची वास्तु…-परिसरात टाकाऊ कचऱ्याचे साम्राज्य;...

देसाईगंज शहरातील कोट्यावधी रुपयांचे सांस्कृतिक भवन बनला शोभेची वास्तु…-परिसरात टाकाऊ कचऱ्याचे साम्राज्य; पिंकु बावणेचा आंदोलनाचा इशारा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- शहराच्या नगर परिषद कार्यालयासमोरील जागेत नागरीकांच्या कराच्या उत्पन्नातुन कोट्यावधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे.सदर सांस्कृतिक भवन शोभेची वास्तु बनल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत असतांनाच परिसरात टाकलेल्या टाकाऊ कचऱ्याने दुर्गंधी सुटली असल्याने परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता नगर प्रशासनाने येथील टाकाऊ कचरा यथाशिघ्र उचलुन विल्हेवाट न लावल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे यांनी प्रशासनाला दिला असल्याने नगर पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

देसाईगंज शहरातील नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्य सोपस्कार पार पाडता यावा याकरीता शहराच्या सर्व्हे नं. २४/५ मध्ये ८ एकरात कोट्यावधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले.या सांस्कृतिक भवनात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असते. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जेवणाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येत असतात.मात्र अलिकडे हे सांस्कृतिक भवन शोभेची वास्तु ठरू लागले असुन परिसरात तयार करण्यात आलेला बगीचा देखील देखभाल दुरुस्ती अभावी नामशेष झाला आहे.

दरम्यान कार्यक्रमानंतर उरलेला टाकाऊ कचरा उचलुन डंपिंग यार्ड मध्ये टाकण्यासाठी सफाई कामगार यंत्रणा कार्यरत असताना टाकाऊ कचरा सांस्कृतिक भवन परिसरातच टाकण्यात येत असल्याने कुजलेल्या कचऱ्याला दुर्गंधी सुटून उग्र वास लगतच्या परिसरात  पसरला आहे.हा वास इतका दुर्गंधीयुक्त आहे की यामुळे अनेकांना परिसरात वास्तव्य करणे कठिण होऊ लागले आहे.अनेकांना मळमळ,पोटाचे आजार अशा विविध समस्या जाणवू लागल्या आहेत.ही गंभीर वस्तुस्थिती लक्षात घेता नगर प्रशासनाने येथील कचऱ्याची यथाशिघ्र विल्हेवाट लावण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे यांनी केली असुन समस्या मार्गी लावण्यात न आल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!