- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता,नगर परिषदेद्वारा महिलांकरीता व्यावसायीक प्रशिक्षणाअंतर्गत टॅली विथ जीएसटी संगणकाचे प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.यामुळे महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहण्याकरीता सक्षम होणार असुन त्यांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने देसाईगंज नगर परिषद क्षेत्रातील महिलांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होत असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभुषण रामटेके यांनी सांगीतले.
शासनाचे मार्गदर्शक सुचनानुसार महिला व बाल कल्याणासाठी नगर परिषदेद्वारा विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.त्याचाच एक भाग म्हणून चालू आर्थिक वर्षाकरीता नगर परिषदेद्वारा व्यावसायीक प्रशिक्षणाअंतर्गत महिलांकरीता टॅली विथ जीएसटी संगणक प्रशिक्षण देण्यात येत आहे.या प्रशिक्षणामध्ये तांत्रिक आणि व्याख्याने प्रशिक्षण, शासन व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांनी ठरवुन दिलेल्या तासीके प्रमाणे प्रशिक्षण देणे, तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय यंत्रणेकडून कौशल्य चाचणी (MKCL /MSBTE) घेणे क्रम प्राप्त राहणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार उपलब्ध करुन देत प्रमाणपत्र व नियुक्तिपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
देसाईगंज नगर परिषद ही गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव नगर परिषद आहे,जी अशा प्रकारचे नाविन्यपुर्ण प्रशिक्षण आयोजित करीत असते.या प्रशिक्षणामुळे शहरातील महिलांना संगणक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी नक्कीच उपलब्ध होऊन प्रशिक्षणार्थीं महिलांना स्वत:च्या पायावर ऊभे राहण्यास मदत होणार आहे.महिला वर्ग व्यावसायीक दृष्टया सक्षम बनणार असल्याने,त्या आत्मनिर्भर सुध्दा बनणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ.कुलभुषण रामटेके यांनी सांगीतले.यावेळी नगर परिषदेचे लेखापाल अविनाश राठोड,सहाय्यक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे,पीएमएवाय अभियंता विलास बोंदरे,भुषण कुथे तसेच मायक्रोटेक कॉम्पुटर्स देसाईगंजचे संचालक रविंद्र मानापुरे व प्रशिक्षणार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
- Advertisement -