उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणावर उत आले असून यावर निर्बंध घालण्यात यावा त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी देसाईगंज मुक्तिपथ तालुका संघटनेच्या महिला तसेच गावांतील महिला वर्ग एकवटून देसाईगंज शहरातील हुतात्मा स्मारक ते पोलिस स्टेशन,तहसील कार्यालय आणि उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत रॅली काढून सोबतच विविध मागण्यांचे निवेदन शासन दरबारी सादर करून घोषणा दिल्या.
निवेदनामध्ये तालुक्यातील अवैध व्यवसाय,अवैध दारूविक्री बंद करावी,गरीब लोकांसाठी घरकूल उपलब्ध करून रेती उपलब्ध करून द्यावी,सिलिंडरचे भाव कमी करावे,अपंग दारू विक्रेत्यांच्या योजना रद्द कराव्यात,तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील किराणा,पानठेल्यावर कायद्याने बंदी असतानाही सुगंधित तंबाखू विक्री होते.ती बंद करण्याकरिता कायद्या अंतर्गत नोंदणी करावी,आदी मागण्यांचा समावेश आहे.यावेळी शहरासह तालुक्यातील विविध गावातील दारू विक्रेत्यांची यादी पोलिस विभागाला सादर करण्यात आली.
निवेदन सादर करतेवेळी देसाईगंज मुक्तिपथ तालुका संघटनेच्या महिला तसेच तालुक्यातील गावांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.