उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील कोकडी गावानजीकच्या पाणवठ्यावर दोन वाघ पाणी पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.रस्त्याने जात असलेल्या एका इसमाने वाघ पाणी पीत असल्याचे छायाचित्रण करून मोबाईलद्वारे व्हायरल केल्याने सदर घटना उघडकीस आली आहे.
सध्याच्या घडीला वन्य प्राणी व मानवी संघर्ष कमी झाला असला तरीही देसाईगंज व आरमोरी तालुक्यात अनेकांना वाघ वा वाघीण यांचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.अशातच काही दिवसांपूर्वी आरमोरी तालुक्यातील एका इसमावर वाघाने झडप घालून गंभीररित्या जखमी केले होते.काही जाणकारांच्या मते,सदर वाघ वा वाघीण काही जंगल परिसरात सोडलेले नसून बाहेर ठिकाणाहून भटकंती करीत आलेले वाघ वा वाघीण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.मात्र हल्ली शेतकरी बांधव,वाहन चालक व इतर नागरिकांना वाघांचे दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.