उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- मागील काही वर्षांपासून स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी पॉश मशिनवर हाताचा अंगठा लावुन धान्याची ऊचल करावी लागत होती.परंतु अनेक लाभार्थ्यांच्या बोठाचे ठसे मशिनवर लागत नसल्याने त्यांना धान्याची ऊचल करतांना अडचणी लक्षात घेता लाभार्थ्यांना धान्य घेणे सुलभ व्हावे; यासाठी आता नवीन ४ जी नेटवर्क असलेली आयरिस प्रणाली युक्त नविन ई- पॉस मशिनवर बोटांच्या ठशा सोबतच डोळ्यांचे स्कॅनिंग करून शिधापत्रिका धारकांना धान्य मिळणार आहे.देसाईगंज तालुक्यातील ६४ रेशन दुकानदारांना नविन ई-पॉस मशिनचे वितरण देसाईगंज तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बोळे,निरीक्षण अधिकारी मोरे,गोदाम रक्षक गुणवंत टिकले,कंपनीचे अधिकारी विनोद गडपायले,अभियंता कैलास छिपे यांच्या उपस्थितीत दिनांक-६ जून रोजी करण्यात आले.
प्रसंगी देसाईगंज तालुक्यातील शिधापत्रिका धारकांनी जवळच्या स्वस्त दुकानात जाऊन रेशनकार्डातील सर्व व्यक्तीचे आधार प्रमाणिकरण व ईकेवायसी करून घेण्याचे आवाहन निरीक्षण अधिकारी मोरे यांनी केले आहे.
मशीनचे वाटप करतेवेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे देसाईगंज तालुकाध्यक्ष दादाजी भर्रे, कार्याध्यक्ष वासुदेव दुपारे,उपाध्यक्ष सुरेश दुनेदार, सचिव अरूण कुंभलवार,प्रमोद दोनाडकर,रवी भिलकर,अमोल जोहरी,श्रीधर कुथे,कृष्णा दोनाडकर,नाकाडे पाटील,मुखरू कुथे,खुशाल बुल्ले,अरविंद कुथे,राजिक पटेल,लीलाधर भर्रे आदीसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

