- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली:-सूक्ष्म व लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा ऍक्ट २००५ च्या नियमावलीनुसार स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आयएसओ (ISO)मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि देसाईगंज नूतन शिक्षण प्रसारक मंडळ आदर्श कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,करिअर काउन्सलिंग आणि प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार १५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ पर्यंत एकूण ५ दिवस सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.भरती होणाऱ्या युवकांना परमानंट नोकरी दिली जाणार आहे.त्याचबरोबर सर्व सुविधा,ज्यामध्ये पी.एफ.सुविधा, मेडिकल,ग्रॅजुटी, पी.एफ.पेन्शन,विधवा पेन्शन,अनाथ पेन्शन व नियमानुसार भत्ते दिले जाईल,तसेच पेमेंट(वेतन) हे महाराष्ट्र गार्ड बोर्ड नियमाप्रमाणे दिले जाणार आहे. वेतन हे १५ हजार रुपयांपासून ते २३ हजार पर्यंत मिळेल व सर्व सूविधा दिल्या जातील.
पात्रता👇
युवक कमीत-कमी १० वी पास असावा,वय १८ ते ४० असावे,उंची १६७ सेंटिमीटर पेक्षा जास्त असावी, वजन ४८ किलो पेक्षा जास्त असावे तसेच युवक हा मेडिकल फिट असावा.
सदरची भरती प्रक्रिया ही येत्या,मंगळवार १५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ पर्यंत सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत देसाईगंज आदर्श कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे सुरू राहणार असल्याने सदर सुरक्षा रक्षक भरतीचा जास्तीत-जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा,असे आवाहन भरती अधिकारी महेश सरतापे व चंद्रशेखर सिंग यांनी केले आहे.
अधिक माहिती करिता संपर्क :-9552238057, 9569721640.
- Advertisement -