Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या शिवराजपुर येथे बांधकाम कामगार मेळावा संपन्न..

देसाईगंजच्या शिवराजपुर येथे बांधकाम कामगार मेळावा संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जातो.अश्यातच प्रत्यक्षात काम करणाऱ्या कामगारांना योजनेची माहिती,त्यासाठी लागणारे दस्तऐवज,मिळणारा लाभ व योजनेपासून कुणीही वंचित राहू नये,यासाठी आज, शनिवार २१ जून रोजी शिवराजपुर गट ग्रामपंचायतीच्या सभागृहात कुरुड-कोकडी जिल्हा परिषद क्षेत्रातील नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांचा मेळावा भारतीय जनता पार्टी तालुका देसाईगंज ग्रामीणच्या वतीने पार पडला.प्रसंगी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी लोककल्याणकारी सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जनतेची सेवा करावी व तालुकास्तरावरच सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळावा,यासाठी प्रयत्न करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आला.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी सभापती रोशनी पारधी ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी, देसाईगंज जिल्हा परिषद सिंचाई विभागाचे सेवानिवृत्त  उपविभागीय अधिकारी माणिक बनसोड,माजी उपसरपंच तथा शिवराजपुर गट ग्रामपंचायतीचे सदस्य वासुदेव झिलपे,कल्पतरू असंघटित कामगार संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अंबादे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर मेळाव्यास कुरुड-कोकडी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेकडो बांधकाम कामगार यांचेसह नागरिक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!