Tuesday, September 8, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या गजानन मंदिर परिसरात तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा... - ५२ वर्षांपासूनची...

देसाईगंजच्या गजानन मंदिर परिसरात तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा… – ५२ वर्षांपासूनची परंपरा आजही कायम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-बैल पोळ्याला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवशी साजरा होणारा पोळा म्हणजे तान्हा पोळा; तान्हा पोळ्याचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देसाईगंज शहराच्या गजानन मंदिर परिसरात आज,मंगळवार दिनांक-३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास देसाईगंज शहराच्या माता वार्डातील युवकांच्या पुढाकारातून ५२ वर्षांपासूनची परंपरा आजही कायम राखत तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
माता वार्डातील कमलाबाई गुन्नीलाल अग्रवाल यांनी गजानन मंदिर परिसरात त्याकाळी सर्वप्रथम तान्हा पोळ्याची सुरुवात केली होती.शहराच्या विविध भागातील चिमुकले लाकडी बैलांना सजवून शहरातील मान्यवर,युवक,आबालवृद्ध तसेच नागरिक एकत्र गोळा होऊन तान्हा पोळा भरवल्या जात होता.त्यानुसार माता वार्डातील युवकांकडून ही परंपरा आजही कायम राखली जात आहे.आज तान्हा पोळ्याच्या दिवशी लहान मुले आपआपल्या लाकडी बैलांना सजवून शहराच्या गजानन मंदिर परिसरात शहरातील मान्यवर, युवक,आबालवृद्ध तसेच नागरिक एकत्र गोळा होऊन तान्हा पोळा भरवल्या गेला.या उत्साहाला संस्कृती आणि स्पर्धेची झालर लागलेली दिसून आली.अनेक पालकांनी आपल्या मुलांना वेगवेगळ्या वेशभुषांमध्ये सजवुन आणले होते. गजानन मंदिर परिसर फुगे,तोरण,पताका लावुन सजविण्यात आला.प्रसंगी महादेवाची गाणी वाजवून महादेवाच्या नावाचा जयजयकार करीत बिस्किटे,सेव-चिवडा,फराळ,चॉकलेट व इतर वस्तूंचे गजानन मंदिर देवस्थान व माता मंदिर देवस्थान यांच्या तर्फे ६०० बालकांना खाऊंचे पाकिटे वाटप करण्यात आले.प्रसंगी विविध मान्यवरांच्या हस्ते चिमुकल्यांना नोट बुकही वाटप करण्यात आले.
तान्हा पोळा प्रसंगी प्रतिष्ठित नागरिक मनोहर भुर्रे, मोतीलाल कुकरेजा,राजूभाऊ जेठानी,सचिन वानखेडे जिल्हा सचिव भाजपा,शाम उईके माजी नगराध्यक्ष, कृष्णा भांडारकर,विलास लोखंडे,अनिल फडणवीस, सुधाकर राऊत,नानू मेश्राम,बाळकृष्ण राऊत,आशिष मंगर,प्रकाश वानखेडे,गजानन भुर्रे, खुशाल दोनाडकर, सचिन मशाखेत्री,हेमंत गजघाटे,संगम शेंडे,चेतन डाबरे, अमोल पत्रे,जितु बेहरे,गोलू खेडीकर,योगेश ठाकरे, योगेश शिऊकर विनू गजपूरे,अंकुश नंदागवळी,दिनेश पानसे,शहरातील व वार्डातील आबालवृद्ध तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!