नागपूर :-पोळ्याच्या पाडव्याला म्हणजेच तान्हा पोळ्याच्या दिवशी ‘इडा,पिडा घेऊन जागे मारबत’.. अशा आरोळ्या ठोकत मारबत व बडग्यांची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.नागपूर शहरात मोठ्या संख्येने दरवर्षी ही मिरवणूक काढली जाते.विशेष म्हणजे,हा उत्सव केवळ करमणुकीपुरता मर्यादित नसून या माध्यमातून वर्तमान सामाजिक स्थितीवर प्रकाश टाकला जातो.देशातील व समाजातील प्रमुख घडामोडींचे प्रतिबिंब या उत्सवातून उमटत असते.महागाई, रोगराई,भ्रष्टाचार,अत्याचार,घोटाळे असे विषय या मिरवणुकीच्या केंद्रस्थानी असतात. बैल-पोळ्याच्या म्हणजेच मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्ह्या पोळ्याला मारबत,बडग्याची मिरवणूक काढली जाते.अभिनव प्रथेच्या माध्यमातून वर्षभर देशात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांवर भाष्य करणारे बडगे (पुतळे) तयार केले जातात.
पोळ्याचा पाडवा…! ‘इडा,पिडा घेऊन जागे मारबत’..म्हणीत काढली जाते मिरवणूक…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
काय आहे मारबतीची परंपरा ?👇
धकाधकीच्या या काळात अनेक परंपरा लोप पावताना दिसत आहेत.पण मारबतीची मिरवणूक मात्र,आजही आवर्जून काढली जाते.समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढली जाते.मारबत आणि बडगे म्हणजे अनिष्ट वृत्तीचा धिक्कार आणि निषेध करण्याचे माध्यम आहे. पौराणिक संदर्भ महाभारत काळाचा संदर्भदेखील या उत्सवाला दिला जातो.बालकृष्णाला मारण्यासाठी पुतणा राक्षसी मावशी बनून आली होती.पण कृष्णानेच तिचा वध केला.मारबत म्हणजे पुतणा राक्षसीचे प्रतीक मानून दरवर्षी तिची मिरवणूक काढून दहन केले जाते.या माध्यमातून वाईट प्रवृत्ती, रोगराई,अनिष्ट गोष्टी समाजातून नष्ट व्हावेत; अशी त्यामागची लोकभावना आहे.पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो.या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते.यावेळी घडामोडीवर व समस्यांवर भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी राग आणि संताप व्यक्त केला जातो.
अशी तयार केली जाते मारबत👇
काठ्या,बांबू,तरट ह्यापासून मोठे पुतळे बनवले जातात; त्यावर फाटके कपडे,चिंध्या गुंडाळतात व विविध रंगांनी रंगवतात,मारबतबरोबर जो बडग्या असतो त्याच्या गळ्यात मोडके झाडू,फाटके कपडे, फुटके डबे,टायर तुकड्यांच्या माळा घालतात. बडग्याच्या हातात मुसळ व कमरेला उखळ बांधलेले असते.मारबत व बडग्यांच्या मिरवणुकीचा उत्साह असतो.पुतळे ट्रक,ट्रॅक्टरवर मांडून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते.काही पुतळ्यांच्या आत माणसं शिरून ते त्यांना चालवित नेतात.मिरवणुकीत तरुण व लहानमोठे व्यक्ती उत्साहाने नाचतात, थिरकतात.गुलालाची उधळण केली जाते.त्यानंतर गावाच्या शिवेबाहेर नेऊन या पुतळ्यांचे दहन केले जाते.
भंडारा जिल्ह्यात दिघोरी (मोठी) येथील मारबत उत्सव प्रसिद्ध असून शेकडो वर्षांची परंपरा आहे.या उत्सवातून सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले जाते. वॉर्डावॉर्डातून तयार झालेल्या मारबती शिवमंदिरात एकत्र येतात. त्यानंतर तंट्याभिल्ल व दांडपट्ट्याचे पुजन करून मिरवणुकीला सुरुवात होते.शेवटी टी- पॉइंटवर नेऊन मारबतीचे दहन केले जाते.आजही मिरवणूक निघणार आहे.त्यासाठी गावात उत्साहाचे वातावरण असून जय्यत तयारी केली जात आहे.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

