- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-कित्तेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत.प्रलंबित असलेल्या मागण्या आज होणार,उद्या होणार म्हणत बरेच महिने लोटून गेलीत; मात्र मागण्या पूर्ण होण्याचे नावच घेत नाहीत.यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, २०१८ ते २०२४ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ,५८ महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी,५७ महिन्यांच्या कालावधीच्या घरभाडे भत्त्याची थकबाकी व इतर अन्य काही मागण्या असून केवळ आशा व शेवटी निराशा होत आहे.एसटी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही.परिणामी,ऐन सणासुदीच्या दिवसांत म्हणजे आज,३ सप्टेंबरपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य जनता तसेच गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना बसण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान,ऐन सणासुदीच्या तोंडावर नागरिकांना असे वेठीस धरणे योग्य आहे का?असा सवाल आता प्रवासी विचारत आहेत.
- Advertisement -

