Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीशिवसेनेचे गडचिरोली जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यावर गुन्हा दाखल...

शिवसेनेचे गडचिरोली जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यावर गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बनावट पुरावे देऊन जात प्रमाणपत्र मिळविल्या प्रकरणी ठाकरे सेनेचे गडचिरोली जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यावर कुरखेडा ठाण्यात २८ ऑगस्टला फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.चंदेल यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या निर्णयाआधीच आरमोरी विधानसभा मतदारसंघातून प्रचाराचा नारळ फोडला होता.कुरखेडाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी विवेक साळुंके यांनी खंडपीठाच्या आदेशाचा संदर्भ देत नायब तहसीलदार रेखा बोके यांना प्राधिकृत म्हणून नेमले,त्यानंतर रेखा बोके यांनी कुरखेडा ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार,सुरेंद्रसिंह चंदेल यांनी जात प्रमाणपत्रासाठी दिलेल्या पुराव्याआधारे १ ऑक्टोबर २०१९ रोजी छत्री या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र कुरखेडाच्या तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी निर्गमित केले होते.या प्रमाणपत्राआधारे चंदेल यांनी आरमोरी विधानसभा निवडणूक लढवली होती.यास नीताराम कुमरे रा.चिखली ता.कुरखेडा यांनी आव्हान दिले होते.
त्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २८ नोव्हेंबर २०२२ रोजी हे प्रमाणपत्र रद्द केले.यास चंदेल यांनी न्यायालयात आव्हान दिले.मात्र,न्यायालयातही त्यांचा निभाव लागला नाही.अखेर त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२०,४६५,४६६,४६८, ४७१ नुसार गुन्हा नोंद झाला.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे पुढील तपास करीत आहेत.
कुरखेडा येथील उपविभागीय कार्यालयातून सुरेंद्रसिंह चंदेल यांना दिलेले जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.मात्र,त्यांना हे प्रमाणपत्र देताना योग्य ती तपासणी केली नव्हती का? चंदेल यांच्यावर गुन्हा नोंद झाला,पण प्रमाणपत्र अदा करणारे अधिकारी मोकळे कसे,असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुरेंद्रसिंह चंदेल,गडचिरोली शिवसेना(उबाठा) जिल्हा प्रमुख👇
सूडभावनेने माझे प्रमाणपत्र खोटे ठरविण्याचा खटाटोप केला आहे.मात्र,मी माझी लढाई सोडलेली नाही. न्यायालयात लढा सुरु आहे.माझ्याकडे सबळ पुरावे आहेत; त्याआधारे न्यायदेवता योग्य न्याय करेल असा विश्वास आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!