उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी २० मार्च २०२३ रोजी आदेश काढून अपवादात्मक प्रकरणात सहानुभतीपूर्वक विचार करून जनहितार्थ कायद्या व सुव्यवस्था प्रशासकीय निकडीनुसार अधिनियमातील विविध कलमान्वये पदावधी पूर्ण होण्यापूर्वी बदली करणे गरजेचे असल्यास अशा प्रकरणांमध्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात बदलीचे आदेश काढण्यात आले.त्यानुसार देसाईगंजचे नवे ठाणेदार किरण रासकर तर आरमोरीचे नवे ठाणेदार संदीप मंडलिक यांची नवनियुक्ती करण्यात आली.नवनियुक्ती तर करण्यात आली; मात्र दोन्ही तालुक्यातील ठाणेदार अवैध धंद्यांवर लगाम लावणार की काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी घेतलेले निर्णय वाखाणण्याजोगे आहे.जिल्ह्यामध्ये कधी न घडणारे खरे चित्र आज निदर्शनास येऊ लागले आहेत.
पूर्वी सगळीकडेच अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावली होती.अशातच सध्याच्या घडीला अवैध सट्टा-पट्टी,कोंबडे बाजार,जुगार व इतर अवैधरीत्या चालणाऱ्या धंद्यांवर लगाम लावले आहे.मात्र हल्ली काही ठिकाणी शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री अजूनही जोमाने सुरूच असल्याचे चित्र हल्ली दिसून येत आहे.दिवसाढवळ्या नव्याने मोठ्या प्रमाणावर नवनवीन दारूचा पुरवठा करणारे डोके वर काढू लागले आहेत.
ग्रामीण भागात तळीमांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.दारूच्या आहारी जाऊन काही जणांची संसारे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.अशातच काही अल्पवयीन मुले सुध्दा नशेच्या धुंदीत तल्लीन होतांना दिसून येतात.त्यामुळे असे चित्र दिसू नये याकरिता यावर आवर घालणे आवश्यक आहे.तसेच अवैधरित्या दारू विक्री बंदीवर देसाईगंज,आरमोरी ठाण्यातील नवनियुक्त ठाणेदार लगाम लावणार की काय? याकडे सर्वांच्या नजरा भिडलेल्या दिसून येत आहेत.