Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदिव्यांगांसाठी आर्थिक साहाय्य योजना; खात्यात जमा होणार रक्कम..

दिव्यांगांसाठी आर्थिक साहाय्य योजना; खात्यात जमा होणार रक्कम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून,त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून आर्थिक साहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांना स्वयंरोजगार सुरू करण्याकरिता आवश्यक टूलकिट खरेदीसाठी जास्तीत जास्त १५ हजारापर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे.सदरची योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू असून प्रशिक्षित दिव्यांग अर्जदाराने शासकीय किंवा शासनमान्य प्रशिक्षण संस्थेतून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.या योजनेमध्ये प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येत असून निधी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी)द्वारे आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे करण्यात येणार आहे.निधी वितरित झाल्यानंतर लाभार्थ्याने व्यवसाय सुरू केल्याची खातरजमा करण्यात येईल.पात्र लाभार्थ्यांनी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी  करता येईल.
अनेक दिव्यांग व्यक्ती कौशल्याधारित व्यवसाय जसे की शिवणकाम,मोबाइल दुरुस्ती,संगणक सेवा,ब्यूटी पार्लर, इलेक्ट्रिकल कामे,सुतारकाम,वाहन दुरुस्ती,किरकोळ व्यवसाय इत्यादी सुरू करण्यास इच्छुक असतात; मात्र आवश्यक साधनसामग्रीच्या अभावामुळे त्यांना अडचणी येतात.महाराष्ट्र शासनाच्या विकसित महाराष्ट्र २०४७ या कृती आराखड्यातील दिव्यांग सक्षमीकरणविषयक रोजगार व स्वयंरोजगार या ध्येयाचा एक भाग या पार्श्वभूमीवर शासनाने ही योजना कार्यान्वित केली असून याचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा; असे शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!