Thursday, July 30, 2026
Homeनागपूरजागतिक स्तरावर युद्धाचा भडका; सोने-चांदीच्या दराने उच्चांक गाठला..

जागतिक स्तरावर युद्धाचा भडका; सोने-चांदीच्या दराने उच्चांक गाठला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-जागतिक स्तरावरील युद्धाच्या भडक्याने जीवनावश्यक वस्तूंसह विविध बाबींवर येत्या काही दिवसांत मोठा परिणाम पडणार आहे.कोणत्या वस्तू महागणार हे सांगणे अवघड आहे.तत्पूर्वी युद्धाचा थेट परिणाम भारतासह स्थानिक सराफा बाजारावर पडलेला दिसून येत आहे.सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणाऱ्या गुंतवणूकदारांच्या वाढत्या मागणीमुळे आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने-चांदीच्या किमतींनी पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे. शनिवारच्या तुलनेत सोमवारी २४ कॅरेट सोने ३ हजार ३०० रुपयांनी वाढून १ लाख ७२ हजार रुपये,तर चांदीत ६ हजार ९०० रुपयांची वाढ होऊन २ लाख ९५ हजार ८०० रुपयांवर पोहोचली आहे. अवघ्या दोन दिवसांत झालेल्या या प्रचंड दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागल्याने ग्राहकांनी सध्या दागिने खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.विशेष बाब म्हणजे,दरवाढीमुळे सोने-चांदीच्या दुकानांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.त्यातच, केवळ अत्यंत गरजच भासली तर काही प्रमाणात खरेदी होत असल्याचे चित्र आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!