Wednesday, September 9, 2026
Homeनागपूरदारुड्या टिप्पर चालकाने बाप-लेकीचा घेतला जीव..!

दारुड्या टिप्पर चालकाने बाप-लेकीचा घेतला जीव..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका दारुड्या टिप्पर चालकाने दुचकीस्वारांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला,तर घराशेजारील मुलगी थोडक्यात बचावल्याची घटना उमरेडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहपा पुलालगत घडली.यात सुभाष केशव भिवनकर वय ५२ वर्षे,त्यांची १६ वर्षीय मुलगी जान्हवी भिवनकर दोघेही रा.मोहपा, ता.उमरेड,जि.नागपूर अशी मृतांची नावे असून घराशेजारील मुलगी वंशिका ज्ञानेश्वर नरुले वय १६ वर्षे ही थोडक्यात बचावली असून वंशिकाला पायाला आणि हाताला जखम झाली.याप्रकरणी टिप्परचालक प्रफुल्ल दशरथ भोयर २७ वर्षे,रा.भुयार,ता.पवनी,जि.भंडारा यास उमरेड पोलिसांनी अटक केली आहे.दुचाकीला धडक मारल्यानंतर टिप्परचालक प्रफुल्ल भोयर याने टिप्पर मोहपा गावाच्या दिशेने असलेल्या गिट्टीखदानकडे पळविला.अपघाताची माहिती मिळताच काहींनी टिप्पर अडविला आणि मोहपा गावाच्या वेशीवर टिप्परला संतप्त गावकऱ्यांनी आग लावली.दारूच्या नशेतील टिप्परचालकास काहींनी चांगलेच बदडले.
जान्हवी भिवनकर आणि तिची मैत्रीण वंशिका नरुले या दोघीही उमरेडच्या पब्लिक हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात बारावीला होत्या.काल गुरुवारी बारावीचा मराठी विषयाचा पेपर असल्याने सुभाष भिवनकर हे मोहपा येथून एमएच ३१ एएक्स ७५७८ क्रमांकाच्या दुचाकीने दोघींनाही सोबत घेत उमरेडकडे निघाले होते. अश्यातच उमरेडकडून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ४० बीजी ७७५० क्रमांकाच्या टिप्परची दुचाकीला जोरदार धडक बसली.अपघात इतका भयानक होता की,दुचाकी रस्त्यालगत काही फुटावर फेकली गेली.शिवाय सुभाष भिवनकर यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले.मुलगी जान्हवी भिवनकर ही अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी घेऊन जात असतांनाच तिने वाटेतच मृत्यूला कवटाळले.उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणीअंती तिला मृत घोषित करण्यात आले. जान्हवीच्या मागे दुचाकीवर बसलेली वंशिका नरुले ही थोडक्यात बचावली.दरम्यान,या घटनेनंतर मोहपा परिसरात तणावाची परिस्थिती होती.घटनास्थळी दाखल होत उमरेड येथील अग्निशमन दलाच्या चमूने टिप्परची आग आटोक्यात आणली.दुसरीकडे उमरेड पोलिस घटनास्थळी पोहोचले. टिप्परचालक प्रफुल्ल भोयर यास ताब्यात घेण्यात आले.टिप्परचालकास घेऊन जात असलेल्या पोलिस व्हॅनच्या काचा संतप्त नागरिकांनी फोडल्या.पोलिस व्हॅनच्या छतावर चढून वाहनाचे सायरन तोडण्यात आले.हसत-हसत घराबाहेर पडलेल्या बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!