Tuesday, September 22, 2026
Homeनागपूरदर महिन्याला नागपुरात ८४४ गंभीर गुन्हे..-माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर…

दर महिन्याला नागपुरात ८४४ गंभीर गुन्हे..-माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- उपराजधानीत नवीन वर्षात गुन्ह्यांचा दर कमी होईल अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती.मात्र, प्रत्यक्षात २०२३ च्या तुलनेत या वर्षी गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढली आहे.मागील वर्षी दर महिन्याला सरासरी ८३३ गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले होते.यंदा हा आकडा सरासरी ८४४ वर गेला आहे.२०२१ पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली तर हा सर्वाधिक आकडा आहे.माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांकडे शहरातील गंभीर गुन्ह्यांबाबत विचारणा केली होती. २०२१ पासून ते मार्च २०२४ या कालावधीत नागपुरात किती गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले, हत्या अत्याचार-विनयभंग-फसवणूक यांचे

प्रमाण किती होते याबाबत त्यांनी विचारणा केली होती.प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार नागपुरात जानेवारी ते मार्च या कालावधीत २ हजार ५३४ गुन्ह्यांची नोंद झाली.याची सरासरी महिन्याला ८३३ इतकी होत आहे.२०२३ मध्ये संपूर्ण वर्षभरात ९ हजार ९९९ गुन्हे नोंदविल्या गेले होते.तर, २०२१ मध्ये ८ हजार २३२ व २०२२ मध्ये ७ हजार ७९६ गुन्ह्यांची नोंद झाली होती.

मागील काही काळापासून नागपुरात हत्यांच्या प्रकरणांमुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.जानेवारी ते मार्च या कालावधीत नागपुरात २० हत्यांची नोंद झाली.२०२३ मध्ये पूर्ण वर्षभरात ७९ हत्या झाल्या होत्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!