Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तत्वरा करा..! राशन कार्ड ई-केवायसीची शेवटची संधी..

त्वरा करा..! राशन कार्ड ई-केवायसीची शेवटची संधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राशन कार्डधारक लाभार्थ्यांना
ई-केवायसी संदर्भात पुरवठा विभागाकडून वारंवार आवाहन केले जात आहे.परंतु,ई-केवायसी करण्याकडे
बरेच लाभार्थी दुर्लक्ष करतांना दिसून येत आहेत. अनेक भागात धान्य वितरण प्रणालीत बोगस लाभार्थी असल्याचे निदर्शनास आल्याने राज्याच्या पुरवठा विभागाने कडक धोरण अवलंबले आहे.अन्न सुरक्षा योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा,या दृष्टीने बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्याच्या उद्देशाने शासनाने ई-केवायसी अनिवार्य केली आहे.त्यासाठी आता रेशनकार्डवरील सर्वच सदस्यांचे आधार क्रमांक रेशनकार्डशी संलग्न करणे अनिवार्य केले आहे.ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आधारआधारित ओटीपी किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रदान करणे आवश्यक आहे.शिधापत्रिकेची (राशनकार्ड)ई-केवायसी करण्यासाठी शासनाने आता ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत दिली आहे.केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांनी या मुदतीत ई-केवायसी न केल्यास रेशनचा लाभ बंद होऊ शकतो किंवा रेशनकार्ड निष्क्रिय देखील होऊ शकते.
  • ई-केवायसी प्रक्रिया👇
गुगल प्ले स्टोअरमधून ‘Aadhaar Face RD Service’ ॲप मोबाइलवर इन्स्टॉल करा.त्यानंतर ‘Mera E-KYC’ हे ॲप इन्स्टाल करा.ॲप उघडल्यानंतर राज्य निवडा व ठिकाण टाका.आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP मोबाइलवर आल्यावर तो रकान्यात टाका.माहिती भरल्यानंतर सबमिट बटन क्लिक करा.यावेळी मोबाइल स्क्रीनवर दिसणारी माहिती व्हेरिफाईड करा आणि सबमिट करा.त्यानंतर ‘फेस eKYC’ वर क्लिक करा.सेल्फी कॅमेरा उघडल्यावर डोळे बंद करा व उघडा.फोटो काढून होताच eKYC पूर्ण होईल व तसा मेसेज दिसेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!