Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडकी बहिण योजना गरिबांसाठी आहे; श्रीमंतासाठी नाही.. - गाडी बंगले असणाऱ्यांनी योजनेतून...

लाडकी बहिण योजना गरिबांसाठी आहे; श्रीमंतासाठी नाही.. – गाडी बंगले असणाऱ्यांनी योजनेतून आत्ताच माघार घ्यावी- मंत्री भुजबळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील लाडकी बहीण योजना ही श्रीमंतांसाठी नसून ती गोर गरीबांसाठी आहे.गाडी बंगले असणाऱ्यांनी या योजनेतून आत्ताच माघार घ्यावी; नियमांमध्ये न बसणारेही लाभ घेत असतील ते अडचणीचे होऊ शकते,असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याच्या लासलगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलतांना वक्तव्य केले.मी मागेच सांगितले होते की स्वतःहून त्यांनी सांगावे की मी या नियमांमध्ये बसत नाही.एवढे करुनही ती मंडळी यामध्ये बसत असतील तर ते अडचणीचे होईल.अजूनही गाडी बंगले असतील त्यांनी या लाडकी बहिण योजनेतून माघार घ्यावी,
आतापर्यंत दिले असेल त्यांच्यावर अजून काही कारवाई होऊ नये यासाठी मी प्रयत्न करेल असेही भुजबळ म्हणाले.पोर्टल बंद नाही,मी डिटेल माहिती घेऊन सांगतो असेही ते म्हणाले.जे या नियमांमध्ये बसत नाहीत त्यांनी कृपा करून थांबावे.खरोखरच ज्यांना आवश्यकता आहे त्यांना न्याय मिळेल. पोर्टलबाबत मी मंत्र्यांसोबत बोलून घेईल असेही छगन भुजबळ म्हणाले.निकषात न बसणारे लाभार्थी
ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे,कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे,कुटुंबातील सदस्य नियमित,कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग,उपक्रम,मंडळ,भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.तथापि,अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी,स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे,ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड,कॉर्पोरेशन,उपक्रमाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, संचालक,सदस्य आहेत.ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून)त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे,असे लाभार्थी शासनाच्या वतीने अपात्र ठरविण्यात आले आहे.तरीही एखादी महिला जसे की,पतीकडे चारचाकी वाहन असतांनाही पतीच्या नावाने फॉर्म न भरता वडिलांच्या नावाने फॉर्म भरून लाभ उचलत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली असून अश्यांवर कारवाई होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!