Thursday, June 4, 2026
Homeनागपूरअनुसूचित जाती-जमातींच्या नागरिकांसाठी राज्यभरात तक्रार निवारण जनसुनावणी परिषद..

अनुसूचित जाती-जमातींच्या नागरिकांसाठी राज्यभरात तक्रार निवारण जनसुनावणी परिषद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-अनुसूचित जाती-जमातींच्या नागरिकांसाठी एक दिलासादायक पाऊल उचलत,अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या वतीने येत्या २२ जुलै २०२५ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत राज्यभरात तक्रार निवारण जनसुनावणी परिषद राबविण्यात येणार आहे.या उपक्रमाची औपचारिक घोषणा आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी रविभवन येथे आयोजित पत्र परिषदेत केली.या परिषदेमध्ये वर्षभरात आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यावर भर दिला जाणार आहे जनसुनावणीसाठी नागपूरमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर येथे येत्या २२ जुलैपासून पहिल्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. यावेळी नागपूर जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन,विविध योजनांचा आढावा आणि ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातील चर्चा झाली.अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांना न्याय मिळवून देणे ही आयोगाची प्राथमिकता आहे. या जनसुनावणी परिषदेमुळे त्यांचा विश्वास वाढेल आणि त्यांचे प्रश्न थेट शासनपातळीवर पोहोचतील, असे ॲड.मेश्राम यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी,सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!