- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहराच्या कुंभीटोला मार्गावरील सार्वजनिक नळ योजनेच्या विहीरीपासून काही अंतरावर असलेल्या सती नदीपात्रात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा शनिवार २५ जानेवारीला सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.रोहीत राजेंद्र तूलावी वय २० वर्षे रा.जैतपूरटोला ग्रामपंचायत गोठणगांव, ता.कुरखेडा असे नदीपात्रात आढळून आलेल्या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
घटनेच्या दिवशी शनिवारी सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकला(शारीरिक कसरत) जाणाऱ्या काही नागरिकांना सती नदी पात्रात कुणीतरी झोपलेल्या अवस्थेत दिसून आला.त्यानुसार नागरिकांनी जवळ जाऊन बघितले असता,एक मुलगा मृतावस्थेत दिसून आला.नागरिकांनी याबाबत कुरखेडा पोलिसांना माहिती दिली.कुरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेन्द्र वाघ यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.रोहितच्या अंगावर कोणत्याही जखमा नसल्या तरी घटनास्थळी उलटी केल्याचे निदर्शनास आले होते.त्यामुळे त्याने विष प्राशन केले असावे,अशी शंका नाह्रिकांकडून व्यक्त केली जात आहे.रोहीतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल,असे कुरखेडा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.रोहित मागील दोन वर्षापासून पोलिस भरतीची तयारी करीत होता. त्यामुळे सर्वच घटना संशयपद असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलण्यात येत आहे.
- Advertisement -