उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
कुरखेडा(गडचिरोली) :- कुरखेडा तालुक्यातील खरमतटोला येथील एका कुटुंबातील सदस्यांचे मारहाण प्रकरण वेगळेच वळण घेत असल्याचा प्रकार हल्ली निदर्शनास येऊ लागला आहे.ज्यांनी बेदम मारहाण केली; असे आरोपी मोकाटच… व ‘तो’ म्हणतो सात वर्षाच्या खालील गुन्हा असल्याने अटक कशी काय करणार? नोटीस बजावून गुन्हेगारांना सोडला…..! सदर व्यक्ती अशावरच न थांबता न्यायालयाचा दाखला देऊ लागल्याने याचे नवलच वाटत आहे.
खरमतटोला येथील एका गरीब कुटुंबातील पती व पत्नी मोलमजुरी करून; कसे-बसे उदरनिर्वाह करून संसाराचा गाडा गेली ६० वर्षांपासून हाकत आहेत. संसाराचा गाडा हाकत असतांना सदर कुटुंबास कुणाची नजर लागली हे त्यांना कधी कळलेच नाही.आपल्याच घरच्या कुटुंबातील सदस्यांना काही टोचून बोलणे वा समज देणे हा गुन्हा नाही.अशातच गरीब कुटुंबातील महिला आपल्याच घरच्या सदस्यांना काल २ जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास समज देत असतांना; घरा शेजारील समोरच्या कुटुंबातील सदस्य अचानकपणे धावून येऊन एका गरीब कुटुंबातील महिलेस व ११ वर्षाच्या मुलास दवाखान्यात भरती होनेस्तव लाथा-बुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण करणे कितपत योग्य आहे?मारहाण करण्यात आलेल्या महिलेचा व मुलाचा बयान नोंदवून घेण्यात तर आला.मात्र बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्याऐवजी न्यायालयाचा दाखला देऊन,केवळ नामधारी चौकशी करून व नोटीस देऊन आरोपींना मोकाट सोडले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
समजा; एखाद्या पोलीस पाटील,सरपंच,लोकप्रतिनधी वा लोकसेवक यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बाबतीत असे प्रकरण घडले असते तर….’आईच्या गावात अन् बाराच्या भावात’ असे झाले नसते काय? मात्र कुरखेडा तालुक्यात वेगळीच परिस्थीती पहावयास मिळत आहे.सर्व नजरेसमोर असूनही न दिसल्यासारखे करणे म्हणजे कुठेतरी पाणी मुरल्या जात असावे; याची शक्यता नाकारता येणार नाही. आजच्या घडीला लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली.अशा प्रकारांमुळेच आरोपींची हिंमत अजून वाढत असते व नको ते प्रकार घडत असतात.मात्र याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.अन्यथा याबाबत गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे तक्रार कर्त्यांनी म्हटले आहे.
पुढील वृत्त उद्याला……आरोपींची नावे होणार उजागर….