Saturday, May 30, 2026
Homeगडचिरोलीअहेरी राज नगरीत होणार भव्यदिव्य असे बौद्ध विहार.....-गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा...

अहेरी राज नगरीत होणार भव्यदिव्य असे बौद्ध विहार…..-गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा अहेरी इस्टेटचे दानशूर राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी बौद्ध विहार बांधकामासाठी केली पाच लाख रुपयांची आर्थिक मदत…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील अहेरी येथे भव्यदिव्य असे बौद्ध विहार बांधकाम करण्यासाठी स्थानिक अहेरी  येथील  बौद्ध समाज बांधवांना आर्थिक मदतीची गरज भासत होती; ही बाब अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कानी पडताच त्यांनी स्थानिक अहेरी  येथील  बौद्ध समाज बांधवांना भेटून त्यांच्या कडून त्यांची समस्या आणि त्यांच्या अडचनी जाणून घेतल्या व त्यांना अहेरी राज नगरीत भव्यदिव्य असे सुंदर बौद्ध विहार बांधकाम करण्यासाठी 500000/-(पाच लाख) रुपयाची आर्थिक मदत केली.

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांची आणि विचारांची माहिती व प्रेरणा या बौद्ध विहारातून मिळावी आणि आजच्या युवा पिढीमध्ये संस्कार वाढावे आणि आजचा युवा हा आपलं भविष्य आदर्श व्यक्ती म्हणून समाजात जगेलं,या उद्देशाने हा बौद्ध विहार एक केंद्र बिंदू बनेल,असे मत यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व दानशूर राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले.

तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले बौद्ध विहारातून चांगले कार्य बौद्ध समाजात घडावे आणि आजच्या युवा पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांचे विचार आपल्यात रुजवावे आणि आपली प्रगती करावी,आपलं उज्वल भविष्य बनवावे आणि आपल्या देशाचं नाव,आपल्या राज्याचं नाव व आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक करावे असे मत यावेळी राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी येथील बौद्ध समाज बांधवांना बोलून दाखवले आणि आपण सदैव आपल्या सोबत आहोत असे ते बौद्ध समाज बांधवांना म्हणाले.

यावेळी,बौद्ध समाज ज्ञान प्रसारक युवक मंडळ अहेरी अध्यक्ष एकनाथ चांदेकर, सहसचिव प्रशांत भीमटे, संजय ओंडरे,रमेश अलोने, मारोती ओंडरे, तिरुपती चालूरकर, रोहीत ओंडरे,परशुराम दहागांवकर तसेच स्त्री सदस्य म्हणून सौ.कमलाबाई ओंडरे, शोभाताई भीमटे, कमलताई अलोने, प्रफुता ढोलगे, लताताई ओंडरे, सरिताताई अलोने, रसिकाताई दहागांवकर, मायाताई दुर्गे, माधुरीताई माउलीकर,भारतीताई ओंडरे, दिव्याताई अलोने, शकुन अलोने उमाताई चल्लूरकर,गंगासागर कांबडे,निर्मला दुर्गे,सुगणाबाई दुर्गे, इत्यादी अहेरी येथील बौद्ध समाज बांधव,गावकरी व महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर क्रत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

लाखांदूर-देसाईगंज मार्गावर पेटत्या कारचा थरार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर-देसाईगंज मार्गावरील दुर्गा माता मंदिर पहाडीजवळ भर उन्हात पेटत्या कारचा थरार काल शुक्रवारी घडला.लाखांदूरहून निघालेली कार सोनी-चप्राळ पहाडीजवळ येताच धावत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!