Saturday, October 17, 2026
Homeचंद्रपूरट्रकची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नीचा मृत्यू..

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नीचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-दुचाकीने स्वगावी निघालेल्या कुटुंबियांवर काळाने झडप घालून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार ६ एप्रिल रोजी सायंकाळी चारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील धानापुर गावाजवळ घडली.तर गंभीर जखमी पत्नीचा पुढील उपचारार्थ रुग्णालयात हलविले असता वाटेतच मृत्यू झाला,तर यात त्यांची सहा वर्षीय चिमुकली थोडक्यात बचावली.गौतम सुरेश निमसरकर वय ३६ वर्षे,रा.अनखोडा,ता.चामोर्शी, जि.गडचिरोली व वैशाली गौतम निमसरकर वय ३० वर्षे असे अपघातात मृत पावलेल्या पती-पत्नीचे नाव आहे,तर सिया गौतम निमसरकर वय ६ वर्षे असे अपघातात बचावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील निमसरकर कुटूंबीय एमएच ३३ एबी ८०६७ क्रमांकाच्या दुचाकीने चंद्रपूरहून स्वगावी जाण्यासाठी निघाले होते.दरम्यान,गोंडपिपरी तालुक्याच्या धानापुर येथील जिनिंगजवळ येताच एमएच ३४ एबी २३२४ क्रमांकाच्या भरधाव वेगात असलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागेहून जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की गौतम निमसरकर हे जागीच गतप्राण झाले.तर गंभीर जखमी झालेल्या वैशाली निमसरकर यांना तात्काळ गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असतांनाच मृत्यू झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!