उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक देताच ५ वर्षाची नात व ७० वर्षाचे आजोबा यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज २५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
कवळू बडवाईक वय ७० वर्षे व वाणी महेंद्र बडवाईक वय ५ वर्षे दोघेही रा.नवीन पुनर्वसन पिंडकेपार (बेला) असे अपघातात ठार झालेल्या आजोबा आणि नातीचे नाव आहे.कवळू बडवाईक हे आयुध निर्माणीतून सेवानिवृत्त झाले होते.त्यांची नात वाणी ही भंडारा येथील गायत्री विद्या मंदिरात शिक्षण घेत होती.तिला दररोज सकाळी शाळेत घेऊन जाणे व सुटीनंतर तिला परत आणणे असा त्यांचा नित्यक्रम होता.दरम्यान, आज दुपारी शाळेची सुट्टी झाल्यानंतर ते वाणीला घेऊन दुचाकी क्र.एमएच ३६ टी ३७५३ ने गावाकडे जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्पर क्रमांक एमएच ४९/०७०१ ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी भंडारा पोलिसांनी टिप्परचाल काविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहेत.