Wednesday, August 12, 2026
Homeदेसाईगंजजुनी वडसा येथील ग्रामस्थांची क्रिडांगण संकुलाची  मागणी…-देसाईगंज नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर…

जुनी वडसा येथील ग्रामस्थांची क्रिडांगण संकुलाची  मागणी…-देसाईगंज नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज नगर परिषद हद्दीत असलेल्या जुनी वडसा येथे होतकरू तरुण युवक-युवतींसाठी क्रिडांगण संकुलाची नितांत गरज आहे.धावपट्टी,गोळाफेक,मैदानी खेळ तसेच इतर बाबिंकरिता जुनी वडसा येथील खुली असलेली जागा क्रिडांगण संकुलासाठी देण्यात यावी; अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक तथा देसाईगंज भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सचिन खरकाटे तसेच ग्रामस्थांनी मिळून नगर परिषदेचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांच्याकडे केली आहे.

खुल्या असलेल्या जागेवर जुनी वडसा येथील ग्रामस्थ परंपरागत बैलांचा शंकरपट भरवित आले आहेत.त्यामुळे पटाचे दान म्हणुन सदरची जागा ही राखीव ठेवण्यात आली आहे.गावठाण नंबरच्या जागेवर नगर परिषद कार्यालयाकडुन जिम व सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे.मात्र,पटाचे दान असलेल्या खुल्याजागेवर गावकऱ्यांनी वैयक्तिक वर्गणी गोळा तरूण मुला-मुलींसाठी तात्पुरत्या स्वरूपाची धावपटटी तयार करण्यात आली आहे.तसेच करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे.त्यामुळे याचा फायदा जुनी वडसा वासियांना तसेच तरूण मुला-मुलींना झालेला आहे.अनेक तरूण-तरुणी तयार करण्यात आलेल्या क्रीडा जागेवर मेहनत केल्याने अशांची सरकारी पदावर नेमणुक झाली आहे.त्यामुळे गावातील जनतेला व तरूण मुला-मुलींसाठी सदर जागेवर पक्क्या स्वरूपाचे नवीन क्रिडांगण संकुलाची अत्यंत आवश्यकता असल्याने; सदरची जागा क्रिडांगण संकुलासाठी देण्यात यावी; असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश दुर्घटनेनंतर प्रशासनाची कठोर कारवाई; मुख्याध्यापक व दोन वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल.. – आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने गंभीर...

२० हजाराची लाच घेतांना वनक्षेत्र सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात; तर उपस्थित दोन वनरक्षकही ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राच्या राजुली सहवन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या परसटोला येथील राउंड ऑफिसमध्ये गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)पथकाने २० हजाराची...

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!