उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :-
ग्रामीण भागातील नागरिक खाजगी मोबाईल सेवा देणाऱ्या जिओ कंपनीच्या इंटरनेट सेवांमुळे त्रस्त झाले असून जिओ ही मोबाईल सेवा देणारी व इंटरनेट सेवा देणारी सर्वात मोठी कंपनी आहे.या कंपनीचे राज्यात असंख्य ग्राहक वर्ग आहेत.
ग्राहक वर्ग असंख्य तर आहेत परंतु जिओच्या कासवगतीने चालणाऱ्या इंटरनेट सुविधेमुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे.सध्या ग्राहक वर्गांकडून मोठ्या रकमेचे रिचार्ज करण्यास या खाजगी कंपन्यांकडून भाग पाडले जाते.मोठी रिचार्ज करूनही सुविधा मात्र बरोबर दिली जात नसल्याचे जिओ ग्राहक वर्गांकडून बोलले जाते आहे. कित्तेक शासकीय कार्यालय,सुविधा सेतू केंद्र,सामान्य नागरिक व इतर जिओ सीम कार्डचा वापर नेहमी करतांना दिसतात.जिओ सिमची इंटरनेट सेवा ही खाजगी स्वरूपाची असल्याने ग्राहकांना सेवा मिळो अथवा न मिळो याचे या खाजगी कंपन्यांना सामान्य जनतेशी काही देणेघेणे नसते.मात्र या खाजगी कंपन्यांवर शासन स्तरावरुन काही निर्बंध लादले गेले तर अशा कंपन्यांवर सेवा देण्याबाबत आळा घालता येईल.अन्यथा खाजगी मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या आपल्याच मनाचा कारभार करून ग्राहक वर्गांची लूट केल्या शिवाय राहणार नाही.
त्यामुळे जिओ सेवा देणाऱ्या खाजगी कंपनीने सुरळीतपणे ग्राहक वर्गांना इंटरनेट सेवा देण्यात यावी अशी मागणी जिओ ग्राहक वर्गांकडून केली जात आहे.