उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- जागतिक महिला दिनी आज ८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास चंद्रपूर शहरात एका युवतीने गुडबाय म्हणत जगाचा निराेप घेतला.युवतीच्या आत्महत्येने तिच्या मैत्रिणींना माेठा धक्का बसला आहे.
युवती चंद्रपूर शहरातील घुटकाळा वार्डात भाडे करार तत्वावर राहत होती.मूळ भंडारा जिल्ह्यातील करांडला येथील रहिवासी असलेली गायत्री रामटेके ही स्पर्धा परीक्षेसाठी चंद्रपुरात वास्तव्याला होती.
आज पहाटे स्वतःच्या रूमवर गायत्रीने आत्महत्या केली.मात्र त्याआधी तिने समाज माध्यमातून हे माझे शेवटचे चित्र असून गुड बाय असे म्हणत पोस्ट टाकली.घटनेची माहिती परिसरात कळताच नागरिकांनी पोलीस प्रशासनास सदर घटनेची माहिती दिली.शहर पोलिस ठाण्याचे पथक प्रकरणाचा अधिक तपास करीत असून जागतिक महिला दिनी युवतीने केलेल्या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.