उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- प्राप्तिकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर काल १४ फेब्रुवारी ला धाडसत्र राबविल्या नंतर दिवसभर आणि दुसऱ्या दिवशीही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची टीम हजर होती.आयकर विभागाने प्राप्तिकर खात्याच्या नियमानुसार,हे कर चोरी संदर्भातील सर्वेक्षण असल्याचे म्हटले आहे.
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) हे इंग्लंडचे मीडिया हाऊस आहे.बीबीसी रॉयल चार्टर अंतर्गत कार्यरत आहे.इंग्लंडच्या राजघराण्याद्वारे दिलेल्या अधिकारातून ही वृत्तसंस्था सुरु आहे.बीबीसीचे जगभर कार्यालये आहेत.बीबीसीचे मजबूत नेटवर्क आहे.जगातील खडानखडा माहिती बीबीसी जमविते. बीबीसी समूह चालविण्यासाठी ३,००० कोटी रुपये खर्च आहे.तर बीबीसीचा निव्वळ नफा २०२१ मध्ये २,७०० कोटी रुपये होता.मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीबीसीची एकूण संपत्ती ३१,००० कोटी रुपये आहे. यावरुन या वृत्तसंस्थेचा डोलारा किती मोठा आहे हे समजून येते.