उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर(चिमूर) :- तालुक्यातील वाघोडा येथे ग्रामपंचायतीतर्फे खड्डे खोदकाम सुरू असतांना आरोपींनी खड्डे नसल्याचा आरोप करीत ग्रामसेवक संजय ठाकरे यांच्याशी वाद घातला.वाद इतके विकोपाला गेले की,आरोपींनी चक्क ग्रामसेवकालाच ग्रामपंचायतीत कोंडून पसार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी वाघोडा येथे उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की,खड्डे खोदकाम सुरू असतांना कामावर सात मजुर कार्यरत होते.सदर कामाची देखरेख गावातील रोजगार सेवक रमेश गजभिये यांच्याकडे सोपविण्यात आली.त्यानुसार खड्डे खोदकाम सुरू होते.मात्र ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजय ठाकरे कर्तव्य बजावित असतांना आरोपी राजू कावळे,प्रभाकर रणदिवे,उमेश मगरे व सुधाकर ढोक हे ग्रामपंचायतीत असणाऱ्या ग्रामसेवक यांच्याशी वाद घालू लागले व सदर कामावर खड्डे नसल्याचा आरोप करू लागले.वाद घालीत असतांनाच क्षणाचाही विलंब न लावता ग्रामपंचायतीत असणाऱ्या ग्रामसेवक यांना आतमध्ये कोंडून चावी घेऊन चौघेही आरोपी पसार झाले.
ग्रामसेवक यांनी आरडा-ओरड केली.मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर ठाकरे यांनी ११२ नंबर डायल करून चिमूर पोलीस प्रशासनास कळविले असता पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन बंद असलेला दा कुलूप तोडून ग्रामसेवकाची कोंडून ठेवलेल्या खोलीतून सुटका केली व आरोपी राजू कावळे,प्रभाकर रणदिवे,उमेश मगरे व सुधाकर ढोक या चौघांवर सरकारी कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.