- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीकडे भरधाव वेगाने जात असतांनाच एका बीएमडब्लू काळ्या रंगाच्या कारचा लाला लजपतराय कॉलेजसमोरील लोटस जेट्टीजवळ आज पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी भीषण अपघात झाला.कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार प्रथमतः मार्गावरील संरक्षण भिंतीला जोरदार धडकली आणि धाडकन कार पुलावरून हवेत उडून दुसऱ्या मार्गावर खाली कोसळली.यात कारचा अक्षरशः चुराडा होऊन कारचे चाक एकीकडे विखुरल्या गेले.या भीषण अपघातामध्ये कारमधील तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.शनाय गज्जल वय २१ वर्षे,धीर्या सेठ वय १७ वर्षे आणि सुमारे २५ वर्षीय एक तरुण अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे असून,नायर रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.तर,कारमधील आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून मुंबई कोस्टल रोड हा दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हला वांद्रे-वरळी सी-लिंकच्या वरळी टोकाशी जोडणारा १०.५८ किमी लांबीचा हाय-स्पीड फ्रीवे आहे. मात्र,ज्या ठिकाणी अपघात घडला तो काही अंतरापर्यंत वळण मार्ग असल्याने वाहनाचा अत्यंत वेग हेच या अपघाताचे मुख्य कारण आहे.पहाटेच्या वेळी रस्ता मोकळा असल्याने कार अतिवेगात होती आणि लोटस जेट्टीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबवले.पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

- Advertisement -

