Sunday, May 31, 2026
Homeनागपूरचार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने काल शनिवारी नागपुरात तिघांचा जीव घेतल्याने अवघ्या चार दिवसांत उष्माघातामुळे तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला आहे.या तिघांचे मृतदेह शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले आहेत. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खोब्रागडे चौकाजवळील जयदीप सोसायटीसमोर पदपथावर सकाळी एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला.त्याला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.यापूर्वी जरीपटक्यातील एका बसथांब्याजवळ एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळला होता.त्याला रुग्णालयात नेत असतांनाच त्याचा मृत्यू झाला,तर तिसरा मृतदेह सीए रोडवरील एका दागिन्यांच्या दुकानासमोर रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आला.तिन्ही मृतांची ओळख पटलेली नाही.पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.मात्र,वाढत्या उन्हामुळेच यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. नवतपाचा कार्यकाळ २ जून रोजी संपुष्टात येणार असल्याने हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार येत्या २४ तासांत आज,रविवार ३१ मे पर्यंत नागपूरसह विदर्भाच्या काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.पावसाळी वातावरण ३ जूनपर्यंत राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तापमानात आणखी दोन ते चार अंशांची घट होईल,असा अंदाज आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!