Sunday, April 19, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपूर जिल्हा वाघांच्या दहशतीत; आज वाघाने दोघांचा घेतला जीव..

चंद्रपूर जिल्हा वाघांच्या दहशतीत; आज वाघाने दोघांचा घेतला जीव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुके सध्या स्थितीत वाघांच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आजच्या  घटना पकडुन सतरा दिवसांत अकरा नागरिकांना जीव गमावला आहे.अश्यातच आज,मंगळवार २७ मे रोजी वाघाने दोघांचा जीव घेतल्याने वन्य प्राण्यांपेक्षा मानवी जीवन सस्ते झाल्याचे दिसून येत आहे.वाघाने एक महिला तर एका गुराखीला ठार केले आहे.महिला ही सरपण गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेली होती.तर इसम हा शेळ्या चराईसाठी जंगल परिसरात गेला होता.आज सकाळच्या सुमारास वाघाने मूल तालुक्याच्या चिरोली गावातील ४५ वर्षीय संजीवनी संजय मॅकलवार हिला ठार केले.तर दुसऱ्या घटनेत  दुपारच्या सुमारास वाघाने मूल तालुक्यातीलच कातांपेठ येथील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय सुरेश मुंगरू सोपानकर याला ठार केले.
मूल तालुक्यातील चिरोली येथील महिला संजिवनी मॅकलवार ही कुटुंबीयांसह वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक-५२४ मधील भगवानपूर जंगल परिसरात आज सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. सरपण गोळा करत असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने संजिवनीवर हल्ला चढविला.तितक्यातच
तिने आरडाओरड केल्याने काही अंतरावर असलेल्या  सहकारी व कुटुंबीयांना वाघाने हल्ला केल्याचे लक्षात आल्याने घटनास्थळी धाव घेत आरडाओरड केली. त्यामुळे वाघ जंगलाच्या दिशेने  पळून गेला.पण तो पर्यंत वाघाच्या हल्ल्यात संजिवनी ठार झाली होती.
सदर घटनेची माहिती गावात होताच नागरिक घटनास्थळी दाखल झाले.सदरची माहिती वनविभागाला देण्यात आली.त्यानुसार वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.
दुसऱ्या घटनेत सुरेश सोपानकार हा शेळ्या,बकऱ्या चारण्यासाठी त्याच परिसरातील चिरोली गाव नजिक जंगल परिसरात गेला होता.दुपारी साडेबाराच्या सुमारास बकऱ्यांचा कळप घरी परतला,परंतु तो घरी परतला नसल्याने कुटूंबियांना व गावकऱ्यांना संशय आला. त्यानुसार वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाने चिरोली येथे जाऊन शेळ्या चारायला घेऊन गेलेल्या गावालगतच्या जंगल परिसरात शोध मोहिम राबवली.दरम्यान,काही अंतरावरच त्याचा मृतेदह वाघाने खाल्ल्याने छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.दोन्ही घटना जवळच असल्याने एकाच वाघाने दोघांनाही ठार केले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!